कोरोना संकटकाळात लाजिरवाणे  कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध

बोल्हेगावमध्ये मुलास मारहाण प्रकरणी कारवाई करण्याची छावा संघटनेची मागणी अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जबाबदार अधिकारी यांनी मस्तवालपणे आपल्या

बोल्हेगावमध्ये मुलास मारहाण प्रकरणी कारवाई करण्याची छावा संघटनेची मागणी
अहमदनगर:
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जबाबदार अधिकारी यांनी मस्तवालपणे आपल्या कर्तव्याचे पालन न करता शहराला काळीमा फासणारे कृत्य केल्या चा निषेध अ.भा. छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला. तर मनपा आरोग्य अधिकारी,अग्निशमन विभाग प्रमुख व कर्मचारी याला तातडीने निलंबीत करण्याची मागणी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी छावाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे,आशा गायकवाड,सुमेता शेजुळ,सुरेखा साळी,विलास कराळे आदि उपस्थित होते. बोल्हेगाव येथील १४ वर्षीय मुलाच्या घरात घुसून मद्यप्राशन करुन महापालिकेचे अरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे,अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ,कर्मचारी बाळू घाटविसावे यांनी मारहाण करुन घराच्या गच्ची वरुन फेकून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या बाबत पीडित मुलाच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द तोफखाना पोलीस स्टेशनला वरील लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. हे अधिकारी व कर्मचारी हे आरोपी असून,त्यांना त्यांच्या पदावरुन तातडीने निलंबीत करण्या ची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.