विना मास्क आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई

नगर – कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत चालले आहे. तसेच राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होत आहे. त्याचप्रमाणे काही नागरिक भररस्त्यावर विना मास्कचे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे आता शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

तोंडाला मास्क न लावता प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. असे असताना अनेक जण यावेळेनंतरही शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने काही जणांवर धडक कारवाई केली आहे.   

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाईची माहिम प्रशासनाने हाती घेतली असून शहरातील एकविरा चौकात पोलिसांनी अनेक वाहनचालकांवर दंडात्मक दुचाकीवर डबल, ट्रिपल सिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली.