राधाकृष्ण विखेंच्या पत्नी आणि नातवंडावर बिबट्याचा हल्ला, कुत्र्यामुळे वाचले प्राण

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे व त्यांची दोन नातवंडे शनिवारी ऊसाच्या शेतात गेले होते. तेथे बिबट्या ताबा धरून बसले होता. बिबट्याच्या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत.

अहमदनगर : भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आणि त्यांचे दोन नातवंडे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी ऊसाच्या शेतात गेल्या होत्या त्यांच्या सोबत दोन नातवंडे होती. शेतात बिबट्या ताबा धरून बसला होता. (attacked by leopard) बिबट्याने राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या पत्नीच्या अंगावर झडप घातली कुत्र्याने मध्येच झेप घेतल्यामुळे विखे पाटील कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत.

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे व त्यांची दोन नातवंडे शनिवारी ऊसाच्या शेतात गेले होते. तेथे बिबट्या ताबा धरून बसले होता. बिबट्याच्या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. शालिनी विखे या शेतात आपल्या नातवांना खाऊ देत होत्यात. मात्र जवळच ऊसाच्या शेतात बिबट्या आपला ताबा धरून बसला होता. बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेताच कुत्र्याने मध्येच बिबट्यावर झेप घेतली यामध्ये बिबट्याने कुत्र्याला पकडून शेतात ओढत नेले.

हा प्रकार पाहून शालिनी विखे प्रचंड हादरुन गेल्या होत्या. त्या पुत्र सुजय विखे-पाटील यांच्या मुलांना घेऊन शेतात गेल्या होत्या. मुलांना खाऊ देत असताना हा प्रकार घडला. मुलेही प्रचंड घाबरली होती. या बातमीची खबर सुजय विखे-पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलांना व शालिनी विखेंना घरी घेऊन गेले. दरम्यान तीघांचीही प्रकृती उत्तम आहे. परंतु पाळीव कुत्र्याच्या मृत्यूचा कुटुंबीयांना दुःख वाटत आहे.