कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 21 गावांत मध्यरात्रीपासून लॉकडाऊन

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील 21 गावांत 14 ते 23 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. इतकेच नाही तर लॉकडाऊन लागलेल्या गावात जमावबंदीही असेल. गावात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहिल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    शिर्डी : राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने कोविड निर्बंधात शिथिलता आणली गेली. मात्र, आता कोरोनाबाबत चिंता वाढविणारी बातमी हाती आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आणखी 21 गावात लॉकडाऊन लावण्यात येत आहे.

    दरम्यान या 21 गावांत 14 ते 23 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मध्यरात्रीपासूनच या लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. इतकेच नाही तर या लॉकडाऊन लागलेल्या गावात जमावबंदीही असेल. गावात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहिल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    गेल्या 24 तासात 2,219  नवीन रुग्ण

    राज्यात काल 2,219  नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात 3,139 रुग्ण बरे झाले आहेत. तर 49 जणांचा मृत्यू झाला. आता राज्यात 29,555 इतके सक्रीय रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण  65,83,896 रुग्ण झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण  64,11,075 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.  तसेच आजपर्यंत 6,05,46,572 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.