लॉकडाऊन शिथिल केल्याने विनाकरण रस्त्यावर फिरू नये

अहमदनगर : शहरात सद्यस्थितीत लॉकडाऊन मध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे.

 महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचे आवाहन

अहमदनगर : शहरात सद्यस्थितीत लॉकडाऊन मध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन अजूनही संपलेला नाही. ककेवळ शिथिलता दिलेली असतांना काही नागरिक मात्र रस्त्यांवरून फिरतां ना दिसू लागले आहेत. ही गोष्ट खूपच धोकादायक ठरू शकते. मात्र करोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन अद्यापही संपलेला नसल्याने नागरिकांनी विनाकरण रस्त्यांवर फिरू नये,असे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.
-करोनाचा धोका ओळखून घरातच थांबणे गरजेचे
नागरिकांनी करोनाचा धोका ओळखून घरातच थांबणे गरजेचे आहे.अन्यथा कठोर कारवाई करावी लागेल,असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे.लॉकडाऊन च्या काळात दिलेल्या सचना व आदेशांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे. सार्वजनिक टिकाणी चेहेर्यावर मास्क अथवा रूमाल बांधणे,सोशल डिस्टन्सिंग चे पालन करणे हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर चा वापर करणे तसेच रस्त्यावर थुंकू नये या आदेशांचे पालन होणे गरजेचे आहे.