rohit pawars push bjp corporators join ncp
रोहित पवार यांचा भाजपला धक्का

कर्जत येथे भाजपच्या दोन नगरसेवकांसह तालुका उपाध्यक्ष व काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अहमदनगर (कर्जत/जामखेड) : कर्जत (Karjat) नगरपंचायतीमधील (Nagarpanchayat) भाजपच्या (Bjp) दोन नगरसेवकांनी (corporators) राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. त्यापाठोपाठ जामखेड (Jamkhed) येथील भाजपच्या तीन सहयोगी नगरसेवकांनीही राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश करणार असल्याचे सांगितले. आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी नगरसेवक फोडून भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.

कर्जत येथे भाजपच्या दोन नगरसेवकांसह तालुका उपाध्यक्ष व काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. १० ऑक्टोबरला तालुक्यातील इतर नेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.