सागर पंचारिया यांची डाक विभाग टेबल टेनिसमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड

    अहमदनगर : प्रधान डाकघर अहमदनगरमधील डाक सहायक सागर शिवकुमार पंचारिया यांची डेक्कन जिमखाना पुणे येथे 25 ते 26 ऑगस्ट दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राज्यस्तरीय डाक विभागीय टेबल टेनिस स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली. महाराष्ट्रातील पंचेवीस स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. त्यामधून पुरुष गटात 5 तर महिला गटात 4 स्पर्धकांची जणांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.

    त्यामध्ये अहमदनगर पोस्टल विभागातून सागर पंचारिया, पुणे विभागातील मधू लोणारे तर मुंबईतील नरेंद्र चिपळूणकर, गवास, ठाकूर तर तेली यांची राष्ट्रीय पुरुष गटातून तर मालवणकर, टिकम मुंबई तर सारिका नलावडे पुणे यांची महिला गटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा कोलकत्ता येथे होणार असून, स्पर्धेत वरील महाराष्ट्र राज्याचे वतीने हे सहभागी होणार आहेत.

    सागर पंचारिया यांच्या निवडीबदल त्याचे पोस्टल संघटनेचे जेष्ठ नेते संतोष यादव, संदीप कोकाटे, प्रकाश कदम, कमलेश मिरगणे, नामदेव डेंगळे, राधाकृष्ण मोटे, तान्हाजी सूर्यवंशी, रमित रोहिला, नितिन थोरवे, अनिल धनावत, बापू तांबे यांच्यासह पोस्टल कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.