saibaba

या शिवाय साई संस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीन बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रुग्णालय व कोविड सेंटरच्या रुग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

    अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या नवीन धोरणाअंतर्गत सोमवारपासून 30 एप्रिलपर्यंत साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

    या शिवाय साई संस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीन बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रुग्णालय व कोविड सेंटरच्या रुग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

    साई संस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्यांदा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सध्या शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. बाहेरून येणाऱ्या भाविकांना पोलिसांनी शिर्डीच्या सीमेवरच अडवून तेथूनच परत पाठवले.