‘मला कुणी शिकवण्याची गरज नाही’, संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

गेली ४ वर्ष खटला न्यायलयात आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या राज्यात आपण राहतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, स्पेशल बेंच तयार करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली.

    अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) कोल्हापूरमध्ये १६ तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे. पण या आंदोलनावरून भाजपचे खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, अशा शब्दांत संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले.

    संभाजीराजे यांनी कोपर्डी इथं जाऊन निर्भयाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोपर्डी प्रकरणानंतर ५८ मोर्चे निघाले होते. याची दखल संपूर्ण देशाने घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा अशी विनंती केली.