संजीवनी पाॅलिटेक्निकच्या ७ विद्यार्थ्यांची यझाकीमधे निवड

    कोपरगांव : मागील अनेक वर्षांपासून संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निकने आपल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देऊन हजारो विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण केले आहे. अलीकडेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने यझाकी इंडिया प्रा. लि. या ऑटोमोटीव्ह क्षेत्रात आघाडीच्या कंपनीने संजीवनी पाॅलिटेक्निकच्या सात विद्यार्थ्यांची अंतिम निकालाअगोदरच ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेऊन नेमणूक पत्रे बहाल केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

    यझाकी कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अजित संजय नाईकवाडे, मयुर चंद्रशेखर बाविसकर, साहील दिलीप दुशिंग , मंथन आप्पासाहेब गोसावी, दर्शन  श्रीराम सोनवणे, अमर अर्जुन सैंदोरे व श्रध्दा सुर्यकांत मोटे यांचा समावेश आहे. प्रत्येक पालकाच्या दृष्टीने त्यांची या महाकाय जगतात सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे त्यांची मुलं-मुली असतात. मुलं जन्माला आल्यापासून पालक त्यांच्या पाल्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी वाटेल ती तडजोड करण्यास तयार असतात. कधी-कधी त्यांच्यात शारीरिक, आर्थिक बळ नसतानाही पाल्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम अविरत करीत असतात. अशा पालकांच्या साथीला संजीवनी नेहमीच एक पावुल पुढे असते.

    पालकांच्या व पाल्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी संजीवनीचे व्यवस्थापन अनोखा पॅटर्न राबवित आहे. त्यामुळे संजीवनीने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. तर काहींना यशस्वी उद्योजक बनविले आहे. संजीवनीचे अनेक माजी विद्यार्थी शासकीय सेवेतही आहेत. अनेक पालक संजीवनी प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. अजूनही अनेक नामांकित कंपन्यांच्या संपर्कात संस्था असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न चालू आहे. संजीवनीचे माजी विद्यार्थीही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रामाणिकपणे काम करून तेथील व्यवस्थापनास मदत करीत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांची संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने पसंती असते, असे कोल्हे यांनी सांगितले.

    माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट  ऑफिसर  प्रा. आय. के. सय्यद यांचेही अभिनंदन केले.