saibaba

देऊळ बंद असले तरी शिर्डीत साईदर्शनासाठी(shirdi saibaba temple close) भाविक मोठी गर्दी(crowd in shirdi) करत असल्याच चित्र सध्या पहायला मिळत आहे. ई पासची अट रद्द झाल्यानंतर आता शिर्डीत परराज्यातील भाविकांची मांदियाळीदेखील वाढत आहे. कळसाचे दर्शन तसेच आरतीचा लाभ भाविक घेऊन समाधान व्यक्त करताना दिसून येत आहे.

शिर्डी: देऊळ बंद असले तरी शिर्डीत साईदर्शनासाठी(shirdi saibaba temple close) भाविक मोठी गर्दी(crowd in shirdi) करत असल्याच चित्र सध्या पहायला मिळत आहे. ई पासची अट रद्द झाल्यानंतर आता शिर्डीत परराज्यातील भाविकांची मांदियाळीदेखील वाढत आहे. कळसाचे दर्शन तसेच आरतीचा लाभ भाविक घेऊन समाधान व्यक्त करताना दिसून येत आहे.

शिर्डीचे साई मंदिर १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मंदिर बंद असल्याने गेल्या ६ महिन्यापासून शिर्डीच अर्थकारण ठप्प आहे. रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या साईंच्या शिर्डीला मंदिर बंदमुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांसह साईसंस्थानला देखील  फटका बसला आहे.लॉकडाऊन उठल्यानंतरही शिर्डीची बाजारपेठ अद्यापही ठप्पच आहे.

पाचव्या अनलॉक मध्ये मंदिरे उघडतील, अशी आशा भक्तांना होती मात्र मंदिराचे टाळे अद्यापही बंदच असून ते उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. देशातील ई पासची अट आता रद्द झाल्यानंतर साईभक्तांनी शिर्डीत येण्यास सुरुवात केली असून राज्यातूनच नव्हे तर बाहेर राज्यातील भाविकसुद्धा कळसाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. साई दर्शनाची ओढ साई भक्तांना स्वस्थ बसू देत नाही मंदिर जरी बंद असल तरी शिर्डीत जाऊन कळसाच दर्शन घेण्यात भक्त धन्यता मांडतात.

साई मंदिर परिसरात आता साईभक्त स्तवन मंजिरीच वाचन करतायत तर साईंच्या सर्वच आरत्यांच्या वेळी कळसा समोर उभे राहून आरतीत ही भाविक मोठ्या संख्येने सहभागी. द्वारकामाई व चावडी परीसरात जाऊन भक्तिभावाने ते हात जोडून पुन्हा परतीचा प्रवासाने माघारी निघतात. सर्वच व्यवसाय व उद्योगांना सरकारने सुरू करन्याची परवानगी दिली मात्र दुसरीकडे आस्थेच्या स्थानावर बंदी कायम असल्याने शिर्डीकर तसेच व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यास आवश्यक त्या उपायोजनेसह साई मंदिर दर्शनासाठी तात्काळ सुरु करण्यास मंदिर प्रशासन सज्ज आहे. नुकतेच साईबाबा संस्थानच्या शिष्टमंडळाने तिरूपती देवस्थानचा दौरा केला आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तशा सुविधादेखील निर्माण केल्या आहे. त्यामुळे साई मंदिर खुले करण्यास राज्य सरकारने लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी साईभक्त शिर्डीकर ग्रामस्थ व व्यापारी करत आहे.