uddav thackery and sharad pawar

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ऐनवेळेस भाजपातून राष्ट्रवादीत आलेले मनोज कोतकर यांची निवड झाली. समितीच्या अध्यक्ष स्थायी समिती सभापती निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक होती आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता.

अहमदनगर : महाराष्ट्रात शिवसेना (ShivSena), राष्ट्रवादी (NCP), आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi government)  स्थापना केली. तर आता स्थानिक निवडणूकीत महाविकास आघाडीमध्ये धुसपूस होऊ नये यासाठी शिवसेनेने लहान भावाची भूमिका घेत राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान दिला आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीतही शिवसेनेकडे अधिक संख्याबळ असूनही राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान दिला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ऐनवेळेस भाजपातून राष्ट्रवादीत आलेले मनोज कोतकर यांची निवड झाली. समितीच्या अध्यक्ष स्थायी समिती सभापती निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक होती आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता. परंतु, शेवटच्या दिवशी मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीने आपल्या सहकारी पक्षाला एक जोरदार धक्का दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी चर्चा केली होती. तसेच शिवसेनेचे मंत्री शकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही एकमेकांशी सल्लामसलत केली होती. या सगळ्यात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत दोन्ही पक्षांना एकत्र आणले होते.