धक्कादायक! आरोग्य अधिकाऱ्याचा उपकेंद्रातच गळफास ; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

डॉक्टर शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व कलेक्टर हे जबाबदार राहतील. वेळेत पेमेंट न करणे, कामाचा अतिरिक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे या कारणास्तव आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

    पाथर्डी : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आरोग्य उपकेंद्रातील अधिकाऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात ही घटना घडली.

    डॉक्टर गणेश गोवर्धन शेळके (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या आरोग्य अधिकारी यांचे नाव आहे. लसीकरण सुरू असताना कार्यालयातच त्यांनी गळफास घेतला. मूळचे बहिरवाडी (तालुका नेवासा) येथील डॉक्टर शेळके हे करंजी आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. लसीकरण सुरू असताना ते तणावाखाली दिसत होते. एका कर्मचाऱ्याकडे त्यांनी कागद व पेन मागितला. त्यानंतर आपल्या दालनात गेले. दालनाचा दरवाजा आत मधून बंद करत त्यांनी सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराच वेळ झाला तरी दालनाचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केला. दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता डॉक्टर शेळके यांनी फॅनला गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले.

    काय आहे सुसाईड नोटमध्ये