धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी ; अकोल्यातील घृणास्पद प्रकार

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका पोलीस कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून तक्रारदार महिला व ग्रामस्थ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सदर पोलीस कर्मचारी आरोपींना पाठीशी घालून खोटे गुन्हे दाखल करीत आहे. तर महिलेस शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. या पोलीस कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन तक्रारदार महिला व इतर तक्रारदार ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांना दिले

    कोतुळ : अकोल्यातील पोलिसांना झाले तरी काय, असा सवाल आता केला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडले. तक्रारदारकडून लाच घेण्याचा प्रकार नेहमी घडत असतो मात्र आता तर तक्रारदारकडून शरीर सुखाची मागणी करण्याची घटना पुढे आल्याने पोलिस खात्याला मान खाली घालण्याची वेळ आली आहे .

    अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका पोलीस कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून तक्रारदार महिला व ग्रामस्थ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सदर पोलीस कर्मचारी आरोपींना पाठीशी घालून खोटे गुन्हे दाखल करीत आहे. तर महिलेस शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. या पोलीस कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन तक्रारदार महिला व इतर तक्रारदार ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांना दिले

    सदर महिलेने तक्रार अर्जात म्हंटले आहे की, मी विधवा असून, दीराबरोवर जमीनीचे वाद सुरु आहे. या घरगुती त्रासाबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. तक्रारीच्या तपासकामी अकोले पोलीस स्टेशनचे या कर्मचाऱ्याने माझ्याशी ओळख वाढवून एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सुरु केले आहे. व सातत्याने शरीर सुखाची मागणी करत आहे. सदर पोलीसाने माझी बदनामी सुरु केली असून, खोटे गुन्हे दाखल केले आहे. या पोलीस कर्मचारीमुळे माझे व मुलाचे जगणे अवघड केले असून, मला आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. एका अल्प वयीन मुलीच्या प्रकरणात त्या अल्पवयीन मुलीला सोन्याबापू कासार याने दारुच्या नशेत घरात घुसून अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात अकोले पोलीस स्टेशनला बालकांचे लैगींक अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीचे यां पोलीस कर्मचारी शिंदे याच्याशी हितसबंध असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी सर्रासपणे पिडीत मुलीच्या घराजवळ येऊन त्रास देण्यास सुरुवात केली. तक्रारदरांनी अकोले पोलीस स्टेशनचे या कर्मचाऱ्या विरोधात गंभीर आरोप करून सदर पोलीस कर्मचारीची चौकशी करुन त्याला निलंबित करण्याची मागणी पोलीस अधिक्षक यांचे कडे केली आहे एकाच पोलीस कर्मचाऱ्यांना विरूढ अनेक तक्रारी आल्याने आता जिल्हा पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात या कडे लक्ष लागले आहे