अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील बिबट्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या
अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील बिबट्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या

अकोले : दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्याची घटना अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे रात्री २ वाजेच्या सुमारास घडली.येथील शेतकरी दौलत देशमुख यांच्या वस्तीवर या  दोन बिबट्यांनी बुधवारी रात्री अक्षरशः धुमाकूळ घातला.गोठ्यातील शेळ्यांच्या कळपावर या दोन बिबट्यांनी हल्ला चढवत तब्बल सहा शेळ्यांच्या नरड्याचा घोट घेत रक्त प्राशन केले

अकोले : दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्याची घटना अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे रात्री २ वाजेच्या सुमारास घडली.येथील शेतकरी दौलत देशमुख यांच्या वस्तीवर या  दोन बिबट्यांनी बुधवारी रात्री अक्षरशः धुमाकूळ घातला.गोठ्यातील शेळ्यांच्या कळपावर या दोन बिबट्यांनी हल्ला चढवत तब्बल सहा शेळ्यांच्या नरड्याचा घोट घेत रक्त प्राशन केले तर यातील काही शेळ्या फस्त केल्या.यात दौलत देशमुख या शेतकऱ्याचे तब्बल ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दौलत देशमुख या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. वनविभागाने या परिसरात तत्काळ  पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दौलत देशमुख व परिसरातील नागरिकांनी केली आहे.