साईमंदिर सुरू करा, अन्यथा…शिर्डीकरांचा इशारा

जिल्हातील सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,शिर्डीतील साईमंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. साई मंदिरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साई मंदिर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे.

    अहमदनगर : जिल्हातील सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,शिर्डीतील साईमंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. साई मंदिरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साई मंदिर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे.

    लॉकडाऊनमुळे हार-फुल विक्रेते, हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिर खुले करण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. कोरोनाचे राज्यात रुग्ण वाढू लागल्यानंतर 5 एप्रिला रोजी साईबाबांचे मंदीर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. मात्र, मंदीरातील दैनंदिन पूजा विधी सुरू आहेत.

    आता लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर इतर शहरे तशीच गावे पुर्वपदावर येत आहेत. मात्र, शिर्डीचे समीकरण वेगळ आहे. साईमंदिर खुले असेल तरच भाविक शिर्डीला येतात आणि त्यानंतर व्यवसायाला गती मिळते. मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत त्यामुळे अनलॉक झाले तरी मंदीरच खुले नसल्याने व्यवसाय सुरू करून उपयोग नाही, अशी अवस्था आहे.

    आसपासचे शेतकरी शिर्डीतील हॉटेल्स हातावर काम करणारी अनेक लोक, हार, फुल, प्रसाद विक्रेते, रेस्टॉरंट अश्यांची आर्थिक परिस्थिती लॉकडाऊनमुळे बिघडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर साईमंदिर खुले करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

    हे सुद्धा वाचा