विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित ; नगरमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना पोषण आहार देऊन गांधीगिरी

खरं तर कोरोनाच्या काळात आठ नऊ महिने शाळा बंद होत्या. त्या काळात पोषण आहार वाटल्याचे कागदावर दिसते. परंतु प्रत्यक्ष वाटला का नाही ? याची चौकशी झाली पाहिजे. पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहे. परंतु त्यांना पाच महिन्यापासून पोषण आहार मिळत नाही.

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून पाच महिन्यांपासून वंचित अाहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांना पोषण आहार देऊन गांधीगिरी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमीनाथ पाचारणे आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी पोषण आहारापासून पाच महिने वंचित राहिल्याचा आरोप जिल्हा जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.

    १०७ मेट्रिक टन गोदामात पडून
    खरं तर कोरोनाच्या काळात आठ नऊ महिने शाळा बंद होत्या. त्या काळात पोषण आहार वाटल्याचे कागदावर दिसते. परंतु प्रत्यक्ष वाटला का नाही ? याची चौकशी झाली पाहिजे. पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहे. परंतु त्यांना पाच महिन्यापासून पोषण आहार मिळत नाही. अधिकारी सांगतात की ठेकेदारांची मुदत नोव्हेंबरला संपली. मग त्याचे नियोजन आधीच का केले नाही. नियमानूसार एक दिवस सुद्धा िवद्यार्थ्यांना पोषण आहारा पासून वंचित ठेवता येत नाही. याला जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई करणार ? गोरगरीबाच्या मुलासाठी आलेला पोषण आहाराचा तांदूळ १०७ मेट्रिक टन गोदामात पडून आहे. तो आता सडून जाईल. नेहमीप्रमाणे न वाटलेल्या पोषण आहाराची बिले निघणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली.