In Kerala, leopard meat is cooked and eaten; Five arrested

शेळकेवाडी येथील युवराज काशिनाथ वायाळ यांचा गट नंबर ( ३९) मध्ये ऊस आहे सध्या ऊस तोडण्याचे काम सुरू आहे मंगळवारी दुपारी ऊसतोड मजूर ऊस तोडत असताना त्याच दरम्यान ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने परसराम धर्माजी सोणवने या ऊसतोड मजूराला पंजा मारला त्यामुळे सोणवने हे किरकोळ जखमी झाले आह

    संगमनेर :  संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर शिवारातील शेळकेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली असून बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्‍यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    याबाबत माहिती अशी की, शेळकेवाडी येथील युवराज काशिनाथ वायाळ यांचा गट नंबर ( ३९) मध्ये ऊस आहे सध्या ऊस तोडण्याचे काम सुरू आहे मंगळवारी दुपारी ऊसतोड मजूर ऊस तोडत असताना त्याच दरम्यान ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने परसराम धर्माजी सोणवने या ऊसतोड मजूराला पंजा मारला त्यामुळे सोणवने हे किरकोळ जखमी झाले आहे त्यांनी मोठ मोठ्याने आरडा ओरड केल्याने बिबट्याने लगेच धूम ठोकली त्यानंतर सोणवने यांना औषध उपचारासाठी घारगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आण्यात आले होते यापूर्वीही परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक शेतकर्‍यांच्या शेळ्या, कालवड ठार केल्या होत्या त्यामुळे आता बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्‍यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.