जिल्ह्यातील भोंदु बुवांचा बंदोबस्त करा, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हेंचे महानिरिक्षकांना पत्र

जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करुन देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्‍या भोंदूबुवाला अखेर पोलिसांनी अटक केली.अशी अनेक नावे प्रचलित वापरुन फसवणूक करणार्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात भोंदु बाबांची प्रकरणे वाढत चालली आहेत. ही प्रकरणे आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याची मागणी विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केली आहे. जिल्ह्यामध्ये बुवाबाजींच्या प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. याबाबत निलम गोऱ्हेंनी नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांना पत्र पाठविले आहे.

पत्रात काय म्हणाल्या निलम गोऱ्हे

अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, महिला अत्याचाराच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोठेवाडी असो कोपर्डी येथील घटनांचा मागोवा घेतला तर अशा घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलीस प्रशासनास विशेष प्रयत्न करणे आवश्यक वाटत आहे.

जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करुन देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्‍या भोंदूबुवाला अखेर पोलिसांनी अटक केली.अशी अनेक नावे प्रचलित वापरुन फसवणूक करणार्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसेच असे बुवा महिलांना लवकर जाळ्यात ओढत असतात. त्यातून महिलांवर अत्याचार झालेले प्रकार आपण यापूर्वी देखील पाहिले आहे. असे असताना या बुवाने महिलांवर देखील अत्याचार केले आहेत का..? या संदर्भात पोलिसांनी महिलांना आवाहन करावी की या भोंदू व्यक्तीने जर कोणत्या महिलेवर अत्याचार केला असेल तर त्यांना पोलिसांना संपर्क करावा व त्यांची नावे गुपित ठेवण्यात यावे.

कालच दि.२० डिसेंबर, २०२० रोजी पहाटे श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी विमल जाधव या ज्येष्ठ महिलेच्या घरातील ५० हजारांचा ऐवज चोरला. त्यांच्या कानातील दागिने खेचल्याने दोन्ही कानाच्या पाळ्या तुटल्या. यात जाधव आजी चांगल्याच जखमी झाल्या आहेत. घरात महादेव जाधव व विमल जाधव हे ज्येष्ठ दामप्त्य होते. सुरवातीला दरोडेखोरांनी घराची कडी वाजविली. प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा उघडण्यासाठी धमकावले.

शेवटी दरवाजा उघडला गेला. दरोडेखोरांनी आत येताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावू लागले. विमल यांनी कानातील दागिने काढून देण्यास विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी कानातील दागिने पकडून जोरात हिसकावले. त्यामुळे जाधव यांच्या कानाच्या दोन्ही पाळ्या तुटल्या. दरोडेखोरांनी कानातील आणि गळ्यातील दागिनेही हिसकावून नेले असल्याचे समोर आले आहे.