अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू

संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी येथे अज्ञात वाहणाच्या धडकेत तीन वर्षीय तरस (मादीचा) मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक २६ डिसेंबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी येथे अज्ञात वाहणाच्या धडकेत तीन वर्षीय तरस (मादीचा) मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक २६ डिसेंबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत माहिती अशी की शनिवारी रात्री पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी येथे महामार्ग ओलंडनाच्या नादात अज्ञात वाहणाची जोरदार धडक या तरस ( मादीला) बसली त्यामुळे तरस मादीचे मागील दोन्ही पाय मोडून डोक्यालाही गंभीर मार लागला होता त्यामुळे हे तरस जखमी अवस्थेत महामार्गावरच होते त्याच दरम्यान घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस हेडकाॅन्सटेबल आदिनाथ गांधले हे त्या ठिकाणाहून जात होते.

त्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर लगेच ते थांबले त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती वनपरिमंडळ अधिकारी आर. बी.माने यांना दिली तोपर्यंत गांधले यांनी काही नागरिकांच्या मदतीने त्या तरसाला महामार्गावरून बाजूला घेतले श्री माने वनरक्षक डी.आर.कडनर,वनमजूर कैलास घोडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत या तरसाला संगमनेरच्या रोपवाटिकेत आणले मात्र त्या अगोदरच तरसाचा मृत्यू झाला होता आज रविवार दिनांक २७ डिसेंबर रोजी त्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.