राज साहेबांना सांगा तुमचा मनसैनिक पूर्ण खचलाय; निलेश लंकेंच्या 1 कोटीच्या दाव्यावर मनसेचा पदाधिकारी भावनिक

अविनाश पवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी अब्रुनुकसानी प्रकरणात थेट राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवावा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही, असं अविनाश पवार म्हणाले आहेत.

    अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. यानंतर मनसैनिक पवार खचल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी याबाबत एक व्हिडीओ जारी करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय. “तुमचा मनसैनिक पूर्णपणे खचलाय. हा सच्चा कार्यकर्ता आहे, कुणापुढेही झुकणार नाही. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत. आता याला तुम्हीच उत्तर द्या,” अशी मागणी अविनाश पवार यांनी केलीय. तसेच मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाल्यास त्याला आमदार निलेश लंके जबाबदार असतील, असाही इशारा दिला आहे.

    दरम्यान अविनाश पवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी अब्रुनुकसानी प्रकरणात थेट राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवावा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही, असं अविनाश पवार म्हणाले आहेत.

    अविनाश पवार यांचा आरोप ?

    11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितलं. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पवार यांनी केला आहे.

    माझी चूक काय आहे. त्यांनी मला आईवरुन शिव्या दिल्या, माझ्या पक्षाला भंगार म्हणाले. चुका यांनी करायच्या आणि पैसे माझ्याकडे मागायचे. आमदार निलेश लंकेंपासून मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. उद्या माझं काही बरं वाईट झालं तर याला हाच व्यक्ती जबाबदार राहिल, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या प्रकरणात काय भूमिका घेतील हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.