माहुली येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी 

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील माहुली येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर मालवाहू आयशर टेंम्पो पलटी झाल्याची घटना मंगळवार दिनांक २९ डिसेंबर रोजी पहाटे घडली आहे केवळ दैवबल्वतर असल्याने चालक हा बालंबाल बचावला आहे.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील माहुली येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर मालवाहू आयशर टेंम्पो पलटी झाल्याची घटना मंगळवार दिनांक २९ डिसेंबर रोजी पहाटे घडली आहे केवळ दैवबल्वतर असल्याने चालक हा बालंबाल बचावला आहे.याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की  मालवाहू आयशर टेंम्पो हा घारगाव कडून संगमनेर च्या दिशेने जात होता मंगळवारी पहाटे टेंम्पो खंदरमाळवाडी शिवारातील माहुली येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आला असता त्याच दरम्यान महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर टेंम्पो पलटी झाला आहे दरम्यान बाजूने एकही वाहण नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे  तर केवळ दैवबल्वतर असल्याने चालक हा बालंबाल बचावला आहे.

टेंम्पो दुभाजकावर पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले असून मागील बाजूचे चाकेही तुटली आहेत  घटनेची माहिती समजताच डोळासणे पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसह  घटनास्थळी धाव घेतली आयशर टेंम्पो मध्ये साहित्य असल्याने त्यामुळे क्रेन बोलावून हा टेंम्पो महामार्गावरून बाजूला घेण्यात आला आहे .