कंटेनरच्या धडकेत दहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू  , चार जण जखमी ; घारगाव येथील घटना

संगमनेर : मालवाहू कंटेनरच्या धडकेत दहा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू  झाला असून चार जण जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या घारगाव येथे रविवार दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी आडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.

संगमनेर : मालवाहू कंटेनरच्या धडकेत दहा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू  झाला असून चार जण जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या घारगाव येथे रविवार दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी आडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नामदेव अंकुश पारधी व त्यांची पत्नी मंगल नामदेव पारधी हे काटवणवाडी डोळासणे येथील राहणार असून ते रविवारी दुपारी आपली दहा महिन्यांची चिमुकली प्रतिक्षा ही आजारी असल्याने तीला दुचाकी क्रमांक एमएच १७. बी.के ८८०९ हीच्यावरून घेवून घारगाव येथील दवाखान्यात आले होते दवाखान्यात औषध उपचार घेतल्या नंतर ते पुन्हा दुचाकीवरून घारगाव वरून डोळासणे कडे  जात होते त्याच दरम्यान घारगाव बसस्थानक येथे आले असता पाठीमागून आलेला मालवाहू कंटेनर क्रमांक टीएन ०२ बीएल ६७२९ याने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे मंगल यांच्या हातातून प्रतिक्षा ही चिमुकली सटकून महामार्गावर पडली त्यात तीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तीचा मृत्यू झाला आहे.

तर मंगल व नामदेव हेही पती पत्नी जखमी झाले आहेत त्याच दरम्यान काही अंतरावर उभे असलेले नवनाथ सखाराम गाढवे व शिवाजी रामचंद्र भागवत या दोघांनाही कंटेनरने जोराची धडक दिली यात नवनाथ गाढवे हे गंभीर जखमी झाले तर शिवाजी भागवत हेही जखमी झाले आहेत या सर्वाना औषध उपचारासाठी संगमनेर येथे नेण्यात आले आहे तर घटनेची माहिती समजताच पोलिस नाईक राजेंद्र लांघे यांनी या कंटेनरचा पाठलाग करत कंटेनर चालकास ताब्यात घेतले आहे दरम्यान प्रतिक्षा या चिमुकलीच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी योगेश नानाभाऊ भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.