Terrible accident in Ahmednagar

अहमदनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. कार-बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.

    अहमदनगर : अहमदनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. कार-बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.

    अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ हा अपघात झाला. रविवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या लक्झरी बसला समोरुन येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली.

    ही धडक इतकी जोरदार होती कार थेट बसच्या बोनटवर आदळली. यात कारचा चेंदामेचा झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांना जागीच प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेले सर्व जण जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.