In Kerala, leopard meat is cooked and eaten; Five arrested

रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरने सुद्धा झाले अवघड 

    संगमनेर :  संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे खुर्द गावासह परीसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी अक्षरशा चांगलाच धुमाकूळ घातला आहे त्यामुळे ग्रामस्थांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी भरने सुद्धा शेतकर्‍यांना अवघड होवून बसले आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून पठारभागातील अनेक गावांन मध्ये बिबट्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी भयभीत झाले आहे अशाच पद्धतीने कोठे खुर्द गावासह परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी भरने सुद्धा अवघड झाले आहे कधी रस्त्यात तर कधी शेतात बिबट्याचे हमखास पने दर्शन होत असते त्यामुळे शेतातील पिकांना पाणी भरावे की नाही असा प्रश्न शेतकर्‍यांन पुढे निर्माण झाला आहे.

    त्याचबरोबर हे बिबटे मोठ मोठ्याने डरकाळी फोडत असतात त्यामुळे शेतकरी आणखीन घाबरून जातात यापूर्वी कधीच येवढ्या मोठ्या प्रमाणावर परिसरात बिबटे नव्हते पण गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे या बिबट्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच गोरक्ष ढोखरे  ज्ञानदेव ढोकरे, दगडू ढोकरे, दत्ता ढोकरे, गोरखनाना ढोकरे आदि शेतकर्‍यांनी केली आहे.