कारची वाहनाला पाठीमागून धडक; घारगांव शिवारात अपघात,तीन जण जखमी 

घारगाव शिवारातील लक्ष्मी हॉटेल जवळ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कार (क्रमांक एमएच १२ जीव्ही ७८,४७ ) ही पाठीमागुन अज्ञात वाहनाला धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये चालक  युवराज चंद्रकांत जाधव वय ४६ , स्मिता युवराज जाधव वय  ४०, व वैष्णवी युवराज जाधव वय १८ सर्व राहणार (पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना १०८ रुग्णवाहिके व्दारे आळेफाटा येथील खासगी हाॅस्पीटल मध्ये औषध उपचाराकरिता दाखल केले आहे. 

    संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात कारने  पाठीमागून अज्ञात वाहणाला जोराची धडक दिल्याने कार मधील तीन जण जखमी झाले आहे हा अपघात शुक्रवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला आहे.

    याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,   घारगाव शिवारातील लक्ष्मी हॉटेल जवळ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कार (क्रमांक एमएच १२ जीव्ही ७८,४७ ) ही पाठीमागुन अज्ञात वाहनाला धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये चालक  युवराज चंद्रकांत जाधव वय ४६ , स्मिता युवराज जाधव वय  ४०, व वैष्णवी युवराज जाधव वय १८ सर्व राहणार (पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना १०८ रुग्णवाहिके व्दारे आळेफाटा येथील खासगी हाॅस्पीटल मध्ये औषध उपचाराकरिता दाखल केले आहे.

    अपघात झाल्याचे समजताच डोळासणे पोलिस मदत केंद्राचे  पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील साळवे, उमेश गव्हाणे, कैलास ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर क्रेन बोलावून सदरचे अपघातातील वाहान रस्त्याचे बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे .