काँग्रेस पक्षाची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी; शरद पवारांच्या वक्तव्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे उत्तर

 राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी जे बांधिल आहेत. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली येवून लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकजुटीने लढाई करावी, असे आपले आवाहन असल्याचे थोरात  म्हणाले. काँग्रेस हा एक विचार आहे. काँग्रेसच्या विचाराला सध्या कठीण काळातून जावे लागत आहे. कारण धार्मिक भेदाभेद करणारे वाढले आहेत. आपण एका विचाराचे आहोत. आपण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असे आवाहन त्यानी केले.

    अहमदनगर : काँग्रेस पक्षाची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यांची दखल घेत माजी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष आणि विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यानी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की पवार साहेबांच्या या विधानाशी सहमत नाही, मात्र त्यांच्या विधानाचा विरोधकांनी कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचे काही नुकसान होणार नाही.

    राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी जे बांधिल आहेत. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली येवून लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकजुटीने लढाई करावी, असे आपले आवाहन असल्याचे थोरात  म्हणाले. काँग्रेस हा एक विचार आहे. काँग्रेसच्या विचाराला सध्या कठीण काळातून जावे लागत आहे. कारण धार्मिक भेदाभेद करणारे वाढले आहेत. आपण एका विचाराचे आहोत. आपण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असे आवाहन त्यानी केले.

    ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलाय त्यावर आम्ही सर्वांना सोबत घेऊन चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ असे ते म्हणाले.