कोरोना काळात ग्रामसेवकांनी दिलेले योगदान कौतुकास्पद

अहमदनगर: जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्थेस सदिच्छा भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. कोरोनाकाळात ग्रामसेवकांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जगन्नाथ भोर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी चेअरमन सुदाम बनसोडे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्‍वर सुर्वे,संचालक सुरेश मंडलिक,प्रमोद कानडे, दादासाहेब शेळके,सुरेश खरड, प्रशांत सातपुते, सुनिता बर्वे, किशोर जेजुरकर,राजेंद्र बागले,श्रीमती अर्चना कडू,रामदास जाधव,जयराम ठुबे,दादासाहेब डौले,संजय गवळी, अनिल जगताप,संजय गिर्र्‍हे,अरुण गाढवे, चंद्रकांत तापकिर,अशोक जगदाळे,जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत आदि उपस्थित होते. याप्रसंगी जगन्नाथ भोर म्हणाले, यापुढेही काम करतांना स्वत: बरोबर कुटूंबालाही जपा, असा मोलाचा सल्ला भोर यांनी दिला. तसेच पतसंस्थेचे काम काज चांगल्या पद्धतीने सुरु असून, सभासदांना देण्यात येणार्‍या सुविधांमुळे त्यांची जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. पतसंस्थेची स्थिती चांगली आहे,यात सर्व संचालक मंडळ व सभासदांचे एकत्रित प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

-चांगले काम करणार्‍यांना मदत केलीच पाहिजे
सध्या ग्रामविकास विभागाच्यावतीने आलेल्या सर्व्हेक्षणाचे काम सर्वांना करावयाचे आहे.त्यासाठी इतरही विभागाची मदत घेण्यात येणार आहे.बदल्याचा बाबतही सर्व समाधानी आहेत.  कोणीही व्हीआरएस घेऊ नये. घाबरण्याचे कारण नाही. अडचणींतून मार्ग काढा. पदोन्नत्तीच्याही संधी आहेत. चांगल्या सूचनांचे स्वागत आहे.चांगल्या कामांना प्रसिद्धीची गरज पडत नाही. सुविधा दिल्यास दुवाही मिळते.चांगले काम करणार्‍यांना मदत केलीच पाहिजे ती आम्ही करु,असे सांगून संस्थेचे काम पारदर्शी आहे. यावेळी निखिल ओसवाल म्हणाले, ग्रामसेवकांनी शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहचविण्याचे मोठे काम करत आहेत.त्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने त्यांच्या अडचणी,प्रश्‍न सोडविण्या साठी आम्ही प्रयत्न करु. पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचे काम चांगल्या पद्धतीने होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रक़ांत तापकिर यांनी केले. ज्ञानेश्‍वर सुर्वे यांनी आभार मानले.