Balasaheb-Thorat

लॉकडाउनच्या शिथीलते नंतर कोरोनाबाबत अनेकांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे सध्या पुन्हा कोरोना वाढीचा धोका वाढू पाहतो आहे. म्हणून प्रत्येकाने मास्क वापरणेसह स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

    संगमनेर : मागील एक  वर्षापासून संपूर्ण मानव जातीवर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले असून या काळात नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले. मात्र लॉकडाउनच्या शिथीलते नंतर कोरोनाबाबत अनेकांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे सध्या पुन्हा कोरोना वाढीचा धोका वाढू पाहतो आहे. म्हणून प्रत्येकाने मास्क वापरणेसह स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

    कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना ना. थोरात यांनी म्हटले आहे की, कोरोना हे संपुर्ण मानव जातीवरील संकट आहे. मागील एक वर्षापासून संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात सरकारला चांगले यश आले. याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. कोरोनाची लसही महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे हे मोठे यश आहे. मात्र लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर कोरोनाबाबत काही जणांकडून झालेला निष्काळजीपणा, अनेक ठिकाणी वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरला आहे. सध्या काही शहरांत कोरोना वाढतो आहे.

    कोरोना अद्याप संपलेला नसून स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना कोरोना पासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन चे पालन करावे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे. या त्रिसुत्रीचा वापर कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे. महाविकास आघाडी सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रात कोरोना रोखण्यापासून चांगला दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी स्वयंशिस्त अत्यंत महत्वाची असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करा किंवा घरगुती समारंभ टाळा, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या. निष्काळजीपणा करु नका. शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहनही महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे.