साई मंदिराची कवाडे उघडली : फुलांची उधळण, दिव्यांची रोेषणाई ; रांगोळ्यांनी साईभक्तांचे स्वागत

साईमंदीर सहा महीन्यानंतर खुले झाल्याने शिर्डीच्या अर्थकारणाला आलेली काजळी दूर होणार असल्याने शिर्डीत दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली. साई मंदिर उघडण्याचा आनंद व्यक्त करत द्वारकामाई परीसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला.

    शिर्डी : शिर्डीच्या साई बाबा मंदिराची कवाडे आज नवरात्रीच्या पहील्या दिवशी ब्रम्ह मुहतार्ला उघडण्यात आली. पहाटेच्या काकड आरतीला शिर्डीकरांसह देशातील विविध भागातून आलेल्या नव्वद भक्तांना साईमंदिरात प्रवेश देण्यात आला. गेल्या सहा महीन्यापासुन साई मंदिर बंद असल्याने प्रत्यक्ष मंदिरात जावुन दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या भक्तांची ईच्छा आज पूर्ण झाल्याने भक्तांच्या चेहºयावर आत्मिक आनंद दिसत होता. आॅनलाईन पासेस आणि देणगी दिलेल्या भक्तांना आज साईंच्या गुरूवारी पहील्यांदा दर्शनाचा मान मिळाला. शिडीर्तील गा्रमस्थांनी साईभत्तांच्या स्वागता साठी रांगोळ्या साकरल्या आहेत. साई संस्थानच्यावतीनेही साईमंदीरात आणि परीसरात फुलांची रोषणाई करण्यात आली आहे. मंदीर उघडण्याच्या पुर्वसंध्येला शिडीर्तील साईपालखी मार्ग ग्रिन अँन्ड क्लिन शिर्डीच्या सदस्यांनी झाडुन स्वच्छ केला आहे.

    शिर्डीत दिवाळीपूर्वीच दिवाळी
    साईमंदीर सहा महीन्यानंतर खुले झाल्याने शिर्डीच्या अर्थकारणाला आलेली काजळी दूर होणार असल्याने शिर्डीत दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली. साई मंदिर उघडण्याचा आनंद व्यक्त करत द्वारकामाई परीसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला.

    पासबाबत अज्ञान
    साईभक्तांना केवळ आॅनलाईन पास घेवुनच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हे आॅनलाईन पासेस कसे घ्यायचे याची माहीती भक्तांना नसल्याने तसेच मोबाईल वर प्रयत्न करुनही पासेस मिळत नसल्याने अनेक भाविकांना ईच्छा असुनही दर्शनासाठी जाता आले नाही