कळस बुद्रुक येथे घराला लागलेल्या आगीत संसारउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या
कळस बुद्रुक येथे घराला लागलेल्या आगीत संसारउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या

कळस बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाकचौरे व पांडुरंग वाकचौरे,प्रविण वाकचौरे यांच्या घराला आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागली. या आगीचा प्रचंड वेग असल्याने काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व संसार उपयोगी वस्तु जळून खाक झाल्या आहेत.

    अकोले : घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे आज घडली.या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले.

    कळस बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाकचौरे व पांडुरंग वाकचौरे,प्रविण वाकचौरे यांच्या घराला आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागली. या आगीचा प्रचंड वेग असल्याने काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व संसार उपयोगी वस्तु जळून खाक झाल्या आहेत.यावेळी तातडीने अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामक बंबलाही पाचारण करण्यात आले व ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीला विझविण्यात यश मिळाले.मात्र तोपर्यंत खूपच नुकसान झाले.

    सदर घर जुन्या सागवान लाकडाचे असल्यामुळे सागवानाने पेट घेऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.सदर ठिकाणी कळस बुद्रुक गावचे पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याचे आदेश दिले. महावितरणचे अधिकारी श्रीराम बागुल तसेच तलाठी प्रमोद शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे केले.

    यावेळी कळस सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे,सरपंच राजेंद्र गवांदे,उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे,अरूण वाकचौरे,जालींदर वाकचौरे,सागर वाकचौरे,गोरख वाकचौरे,सोमनाथ कवडे,राहुल वाकचौरे,नामदेव निसाळ,प्रकाश बिबवे,संजय नवले,प्रविण वाकचौरे सर,आभाळे,नितीन वाकचौरे,सुदाम वाकचौरे,पुरूषोत्तम सरमाडे,कृनाल वाकचौरे,बाबाजी भुसारी,अर्जुन भुसारी,शरद दातखिळे व सर्व ग्रामस्थ तरूण युवावर्ग यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून या नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत करावी अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली.