
इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युटुयब चॅनेलच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, स्वारगेट पोलिस स्टेशन, पुणे यांच्याकडून युटुयब चॅनेल्स नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. इंदोरीकर एका वक्तव्यावरुन वादात अडकल्यानंतर त्यांनी त्याचे खापर युट्युब चॅनेल्सवर फोडले होते. त्यांनतर त्यानी पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशनला भारतीय तंत्रज्ञान गुन्हा दाखल केला होता. इंदोरीकर महाराजांनी 16 जुलै 2020 ला तक्रार केली होती.
अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यासंबंधातील खटल्यातून दिलासा मिळाला होता. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयातील खटला रद्द करण्यात आला.
मात्र, इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युटुयब चॅनेलच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, स्वारगेट पोलिस स्टेशन, पुणे यांच्याकडून युटुयब चॅनेल्स नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. इंदोरीकर एका वक्तव्यावरुन वादात अडकल्यानंतर त्यांनी त्याचे खापर युट्युब चॅनेल्सवर फोडले होते. त्यांनतर त्यानी पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशनला भारतीय तंत्रज्ञान गुन्हा दाखल केला होता. इंदोरीकर महाराजांनी 16 जुलै 2020 ला तक्रार केली होती.
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या तक्रारीचा तपास कोरोना विषाणू संसर्गामुळं संथ गतीनं सुरु होता. परंतु, फेब्रवारी पासून तपास जलद गतीने चालू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 4000 किर्तनाच्या व्हिडीओच्या युट्युब लिंक डाऊनलोड केल्या आहेत. पोलिसांकडून 25 ते 30 मोठ्या युट्युब चॅनेलला नोटीस पाठवल्याची माहिती आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांचं कोणतही अधिकृत संकेतस्थळ किंवा युट्युब चॅनेल नसल्याचे म्हटले होते. किर्तनामध्ये समाजप्रबोधनाच्या भावनेतून बोलतो. युटयुब चॅनेलवरुन माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. तसेच, एका युटुयब चॅनेलच्या चालकांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचंही इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं. आर्थिक फायद्यासाठी माझे व्हिडीओ विनापरवागनी प्रसारित करणे आणि व्हिडीओमध्ये छेडछाड करुन प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत केली होती.