श्रीगोंद्यातील भैरवनाथ महाराज मूर्तीचा मुखवट चोरीला

चोरट्यानी मंदिराच्या उघड्या दरवाज्यावाटे मंदिरात प्रवेश करून भैरवनाथ महाराज मूर्तीच्या डोक्यावरील सोन्याच्या बाळ्या असलेला पितळी धातूचा मुखवटा व त्या शेजारी असणाऱ्या जोगेश्वरी देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र असा एकूण २२हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

    श्रीगोंदा : तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील भैरवनाथ महाराज मूर्तीचा मुखवटाच चक्क चोरट्यानी चोरून नेला आहे. ही घटना शनिवार दि.२१रोजी दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून या चोरीबाबत मंदिराचे पुजारी राजेंद्र धुमाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चोरट्यानी मंदिराच्या उघड्या दरवाज्यावाटे मंदिरात प्रवेश करून भैरवनाथ महाराज मूर्तीच्या डोक्यावरील सोन्याच्या बाळ्या असलेला पितळी धातूचा मुखवटा व त्या शेजारी असणाऱ्या जोगेश्वरी देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र असा एकूण २२हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. भरदिवसा थेट देवाच्या मंदिरात घुसून चोरट्याने देवाचा मुखवटा व दागिने चोरून नेल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित माळी हे करत आहेत.