नवीन पिढीचे संचालक बँकेचा पुढील कारभार चांगल्या पद्धतीने करतील : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बँकेची सभा आज ऑनलाइन पद्थतीने पार पडली. बँक नेहमीच राजकारण विरहित कामकाज करत असून बँकेने आता सेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याची भूमिकाही थोरात यांनी व्यक्त केली.

    नगर –  बँकेचे कामकाज आजवर शिस्तीनेच चालले. पुढेही ही शिस्त कायम राहील. नवीन पिढीचे संचालक बँकेचा पुढील कारभार चांगल्या पद्धतीने करतील आणि बँकेला आणखी उंचीवर पोचवतील, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

    नगर जिल्हा सहकारी बँकेच्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बँकेची सभा आज ऑनलाइन पद्थतीने पार पडली. बँक नेहमीच राजकारण विरहित कामकाज करत असून बँकेने आता सेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याची भूमिकाही थोरात यांनी व्यक्त केली.

    राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मार्गदर्शन केले. राज्यात मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी असून बँकेने शेतकर्‍यांसाठी वीज बिल भरण्यास कर्ज योजना राबवणे गरजेचे आहे. वीज बिल थकित रकमेतून आलेल्या वसुली रकमेतून जिल्ह्यातील विजेसाठीच्या पायाभूत सुविधासाठी या रकमेचा वापर होईल, असे तनपुरे म्हणाले.