देशमुखांचा ठावठिकाणा पोलिसांना माहिती असेल; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

कोरोनाच्या काळात सामान्यांची गर्दी पांगविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. आता त्यांना त्याच लाठ्यांची भीती वाटत असल्याने ते अटक टाळत असावेत. वसुली प्रकरणात वकील आणि अधिकाऱ्याला अटक झाली, मात्र आरोपी फरार आहे, असे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. देशमुख यांनी स्वत: हजर झाले पाहिजे. नाहीच झाले तर पोलिसांना माहिती असेल की ते कोठे आहेत, असा दावा भाजपा नेते, माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.

    अहमदनगर :  कोरोनाच्या काळात सामान्यांची गर्दी पांगविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. आता त्यांना त्याच लाठ्यांची भीती वाटत असल्याने ते अटक टाळत असावेत. वसुली प्रकरणात वकील आणि अधिकाऱ्याला अटक झाली, मात्र आरोपी फरार आहे, असे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. देशमुख यांनी स्वत: हजर झाले पाहिजे. नाहीच झाले तर पोलिसांना माहिती असेल की ते कोठे आहेत, असा दावा भाजपा नेते, माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.

    राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. केंदीय मंत्र्याला तत्काळ अटक केली जाते. गुन्हा घडला महाडमध्ये, दाखल केला नाशिकमध्ये आणि स्थानबद्ध केले रत्नागिरीत. केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीने अटक केली जाते आणि आता माजी गृहमंत्र्याविरुद्ध लूक आऊटची नोटीस जारी होऊनही माजी गृहमंत्री सापडत नाही, हे पटत नाही.

    खरे तर त्यांनी स्वत: होऊन तपास यंत्रणेसमोर यायला हवे. पाच नोटीसा जाऊनही ते हजर होत नाहीत. त्यांना कधी ना कधी ईडीपुढे जावेच लागेल आणि जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावीच लागेल असंही ते म्हणाले.