मागूनही मिळेना शिक्षक; शिक्षण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकताच झाली नियुक्ती

प्राथमिक शिक्षणाधिकारी कुमावत यांच्या लेखी आश्वासनानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेहेंदुरी येथील डॉ. अविनाश कानवडे व विद्यार्थी पालक यांनी आंदोलन मागे घेतले. कार्यालयाला टाळे ठोकल्याने शिक्षण विभाग लगेच ताळ्यावर आल्याची चर्चा होती.

    अकोले / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अकोले तालुक्यातील मेहेंदुरी शाळेसाठी मागणी करूनही शिक्षक मिळेना. त्यामुळे संतप्त झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. शिक्षण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर शिक्षण विभाग लगेच ताळ्यावर आला आणि शिक्षकाची नियुक्ती केली.

    शिक्षण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याची तात्काळ दखल घेतली नाही तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश कानवडे यांनी प्रशासनास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. तेथेच ठिय्या सुरू केला. त्याची दखल अकोले पंचायत समितीचे शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली. आमदार डॉ. किरण लहामटे आणि जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी यात यशस्वी मध्यस्थी करून मेहेंदुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे सांगितले.

    टाळे ठोकल्याने शिक्षण विभाग ताळ्यावर