बिबट्याच्या हल्ल्यातून दोघे जण थोडक्यात बचावले

संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहेत घारगाव येथे रविवारी (ता.10) रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक पोलीस व इतर नागरिकांवर हल्ला केल्याने एकच धांदल उडाली. मात्र, वेळीच प्रसंगावधान राखल्याने सर्वजण बालंबाल बचावले.

संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहेत घारगाव येथे रविवारी (ता.१०) रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक पोलीस व इतर नागरिकांवर हल्ला केल्याने एकच धांदल उडाली. मात्र, वेळीच प्रसंगावधान राखल्याने सर्वजण बालंबाल बचावले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे आपल्या दुचाकीवरुन रात्री गावात गेले होते. त्यानंतर गावातून पुन्हा घारगाव पोलीस ठाण्याकडे येत असताना त्याचवेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या प्रसूत मादी बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. सायलंसवर जोरदार पंजा मारल्याने लांघे यांची दुचाकी व्हायबल  झाली होती घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी काही अंतरावर दुचाकी थांबवली असता मागे वळून पाहिले तर बिबट्याने जोरदार डरकाळी फोडली. तोपर्यंत आजूबाजूचे नागरिक गोळा झाले होते.

त्यानंतरही बिबट्याने पुन्हा या रस्त्यावरुन जाणारे सतीष शिवाजी आहेर यांच्या दुचाकीवर हल्ला केला. परंतु, दोघांनीही प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावले आहेत.दिवसेंदिवस पठारभागात बिबट्यांची संख्या वाढत असून यापूर्वीही बिबट्याने अनेक छोट्या मोठ्या जणावरांवर हल्ले करून त्यांना ठार केले मात्र आता  अनेक जणांना रात्रीच्या वेळी गावात जाणार्‍या रस्त्यावरून जीव मुठीत धरुन येजा करावी लागत आहे .