पिण्याचे पाण्यासाठी मुथाळणे ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

मुथाळणे गावात बेलदार बांधणी ओहळ येथे देखील वनविभागाच्या जमिनीत पाण्याचा मोठा स्त्रोत आहे.येथेही विहीर झाल्यास मुथाळणे गावठाण,ठाकरवाडी, बांगारे वस्ती टँकरमुक्त होऊ शकतात. भैरोबावाडी येथे वनविभागाच्या हद्दीत विहीर केल्यास आदिवासी ठाकर वस्तीचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.

    समशेरपूर : अकोले तालुक्यातील मुथाळणे या ठिकाणी पाण्याचा मोठा तुटवडा असल्याने स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या हद्दीत विहिरी खोदून शाश्वत जलस्रोत निर्माण करावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना मुथाळणे ग्रामस्थांनी दिले.

    मावलाई ओढा, वन बंधाऱ्यानजिक बाराही महिने पाझर होत असून हे पाणी गर्दनी परिसरात वाहून जाते. या ठिकाणी विहीर करून पाईप लाईन द्वारे गावाला पाणी पुरवठा केल्यास कानडवाडी,कुंडाची वाडी,वाळविहिर वाडी,गावंडे वस्ती,काळूची वाडी या परिसरातील पाणी प्रश्न कायमचा सुटू शकतो, असे ग्रामस्थांनी सांगितले.मुथाळणे गावात बेलदार बांधणी ओहळ येथे देखील वनविभागाच्या जमिनीत पाण्याचा मोठा स्त्रोत आहे.येथेही विहीर झाल्यास मुथाळणे गावठाण,ठाकरवाडी, बांगारे वस्ती टँकरमुक्त होऊ शकतात. भैरोबावाडी येथे वनविभागाच्या हद्दीत विहीर केल्यास आदिवासी ठाकर वस्तीचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.

    नायकरवाडी खांड आणि चिमनादरा,मधे वस्ती येथेही वनविभागाच्या हद्दीत विहिरी झाल्यास अनेकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल या आशयाचे निवेदन जि.प.अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर तसेच पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता,वनविभागाचे उपविभागीय अधिकारी,अकोले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामस्थांसमवेत जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे उपस्थित होते.निवेदनावर दत्तू होलगीर,चक्रधर सदगीर,संतू करवर,नामदेव गावंडे, नामदेव फोडसे,भीमा सदगीर,किसन होलगीर, बाळू सदगीर, नवनाथ होलगीर ,भैरू होलगीर आदींच्या सह्या आहेत.