‘अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची ओळख, नितीमत्ता आधी नवऱ्याला शिकवा’ राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची टीका

"रुग्णालयाच्या चुकीमुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला. तेव्हा यांचे पती किशोर वाघ यांनी तक्रारदाराला सल्ला दिला तू नोकरी माग आणि 15 लाख रुपये माग आणि हे सगळ करण्यासाठी त्या तक्रारदाराकडं 4 लाख रुपयांची लाच मागितली. मी नाही तर त्या फिर्यादीने सांगीतलय. म्हणजे मेलेल्या माणसाच्या मड्यावरचं लोणी खाणारी अवलाद तुमची तुम्ही आम्हाला नितीमत्ता शिकवताय?”

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेचा चांगलाच खरपुस समाचार घेतला आहे. ते वनकुटे ता.पारनेर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

    चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना मेहबूब शेख म्हणाले की, “जेव्हा नेता चांगलं काम करत असतो तेव्हा ती गोष्ट एखाद्याच्या डोळ्यात खपते. पहिलं खुन करण्यासाठी सुपाऱ्या घेतल्या जायच्या आता बदनामी करण्यासाठी घेतल्या जातात. लंके साहेब तुमचं प्रकरण अगदी विचीत्र पध्दतीनं मांडलं गेलं लोकांसमोर. माझ्या बाबतीतही अगदी तसंच झालं.”

    “त्या तुमच्या आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नितीमत्ता शिकवायला निघाल्यात. अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची ओळख आहे. आधी नितीमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर निलेश, मेहबूब शेख यांना शिकवा.” अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

    पुढे बोलताना मेहबूब शेख म्हणाले की, “बरं यांनी लाच कशात तर 1997 ला गांधी हॉस्पीटलमधे एका शस्त्रक्रीयेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृताच्या भावाने तक्रार केली की रुग्णालयाच्या चुकीमुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला. तेव्हा यांचे पती किशोर वाघ यांनी तक्रारदाराला सल्ला दिला तू नोकरी माग आणि 15 लाख रुपये माग आणि हे सगळ करण्यासाठी त्या तक्रारदाराकडं 4 लाख रुपयांची लाच मागितली. मी नाही तर त्या फिर्यादीने सांगीतलय. म्हणजे मेलेल्या माणसाच्या मड्यावरचं लोणी खाणारी अवलाद तुमची तुम्ही आम्हाला नितीमत्ता शिकवताय?” असा पलटवार त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.