राहाता येथील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरात चोरी, ग्रामस्थांमध्ये संताप

देवाच्या डोक्यावरील तिन चांदीच्या‌ मुकूटासह सहा किलो चांदीच्या दागिण्यांची दोन चोरट्यांनी चोरी (Theft ) केली. समोरच्या भिंती वरून आत प्रवेश करत मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करत मुर्तीत्या डोक्यावरील मुकूट तसेच पादुका व प्रभावळ चोरून नेली ही सर्व घटणा सीसी टीव्हीत कैद झाली.

राहाता : देवाच्या डोक्यावरील तिन चांदीच्या‌ मुकूटासह सहा किलो चांदीच्या दागिण्यांची दोन चोरट्यांनी चोरी (Theft ) केली. समोरच्या भिंती वरून आत प्रवेश करत मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करत मुर्तीत्या डोक्यावरील मुकूट तसेच पादुका व प्रभावळ चोरून नेली ही सर्व घटणा सीसी टीव्हीत कैद झाली . तिन लाख ३७ हजार रुपये‌ किंमतीच्या आभुषणांची चोरी झाल्याची माहीती मंदिर समितीचे अध्यक्ष सागर सदाफळ यांनी सांगूतले.

दोन अज्ञात चोरटे सिसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाले असून मंदिराच्या मागील बाजून ते निघून गेले पहाटे ३ वाजेच्या सुमारास‌ चोरी झाली चोरीची माहीती कळताच अतिरिक्त पोलिस अधिकारी दिपाली काळे , डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे घटनास्थळी. राहात्याचे पो नि सुभाष भोये यांनी घटनास्थळी धाव घेत श्वानपथकाकडून चोरट्यांचा‌‌‌ माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला ग्रामदैवत विरभद्र महाराज मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून सकाळी मंदिरा समोर मोठ्या संखेने ग्रामस्थ मंदिरा समोर उपस्थीत होते.