पाणबुडी मोटारीची केबल चोरट्यांनी लांबवली ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान 

घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जांबुत बुद्रुक याठिकाणी विठ्ठल भागवत हे शेतकरी राहात आहे त्यांची मुळानदीला सामाईक विहीर असून त्या मध्ये इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार सोडण्यात आली आहे आणि विहीरीपासून ते मोटारीच्या खोक्या पर्यंत सहा एम एम जाडीची  (१५२) मिटर लांबीची केबल टाकण्यात आली होती मात्र नुकतीच अज्ञात चोरट्यांनी ही केबल तोडून नेली आहे जवळपास आठरा हजार रूपये किंमतीची केबल होती. 

    संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांबुत बुद्रुक येथील विठ्ठल विष्णू भागवत या शेतकर्‍याची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारीची  केबल चोरट्यांनी चोरून नेली आहे ही घटना नुकतीच घडली असून त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.

    याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जांबुत बुद्रुक याठिकाणी विठ्ठल भागवत हे शेतकरी राहात आहे त्यांची मुळानदीला सामाईक विहीर असून त्या मध्ये इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार सोडण्यात आली आहे आणि विहीरीपासून ते मोटारीच्या खोक्या पर्यंत सहा एम एम जाडीची  (१५२) मिटर लांबीची केबल टाकण्यात आली होती मात्र नुकतीच अज्ञात चोरट्यांनी ही केबल तोडून नेली आहे जवळपास आठरा हजार रूपये किंमतीची केबल होती.

    या प्रकरणी विठ्ठल विष्णु भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ६० / २०२१ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस हेडकाॅन्सटेबल दसरथ वायाळ हे करत आहे आधीच शेतीमाला बाजारभाव नाही त्यात अशा पद्धतने चोर्‍या होवू लागल्याने शेतकर्‍यांनी डोक्यालाच हात लावला आहे यापूर्वीही अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत.