थोरात कारखान्याचा नवीन इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित

आर्थिक शिस्त,काटकसर, पारदर्शक या वाटचालीवर मार्गक्रमण करत असलेल्या थोरात कारखान्याची वाटचाली गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन   महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केले असून कारखान्याच्या ४० हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचा, सी.पी.यु युनिट व लिप्टचा शुभारंभ करण्यात आला.

    संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्यातून दारू निर्मिती न करण्याचा दूरदृष्टीने निर्णय घेतला. ही परंपरा व आदर्श तत्वे साखर कारखाना व अमृत उद्योग समूहाने जपत देशात लौकीक प्राप्त केला आहे. आर्थिक शिस्त,काटकसर, पारदर्शक या वाटचालीवर मार्गक्रमण करत असलेल्या थोरात कारखान्याची वाटचाली गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन   महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केले असून कारखान्याच्या ४० हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचा, सी.पी.यु युनिट व लिप्टचा शुभारंभ करण्यात आला.

    सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी   थोरात , माजी खासदार अर्थत-ा डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार डॉ. सुधीर तांबे , दुर्गा तांबे , रणजितसिंह देशमुख ,बाजीराव  खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, अमित पंडित, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ,उपाध्यक्ष संतोष हासे,रामहरी कातोरे,सभापती सौ.सुनंदाताई जोर्वेकर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

    यावेळी थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत हा तालुका प्रगतीपथावर पोहोचला आहे. कारखान्याने नव्याने पाच हजार पाचशे मेट्रिक टन क्षमतेसह ३० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प हाती घेतला. हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरला. याच बरोबर डिस्टलरी प्रकल्पाचे नूतनीकरण करताना चाळीस हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ ही होतो आहे हे अत्यंत अभिमानास्पद आहे. वीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्पातून कारखान्याला मदत होणार आहे.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दारु न बनविता इंडस्ट्रीयल अल्कोहोल बनविण्याचा दुरदृष्टीने निर्णय घेतला. कारखान्याने ऊस उत्पादक व सभासदांचा मोठा विश्‍वास संपादन केला असून तालुक्याच्या विकासात योगदान देत सुरु असलेली ही कारखान्याची वाटचाल गौरवास्पद आहे. असे ही ते म्हणाले.

    डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, संगमनेर हे सहकाराचे मॉडेल आहे. येथे चांगल्या तत्त्वांची जपवणूक केली आहे आणि ही जपवणूक राज्याला दिशादर्शक ठरणारी आहे. महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात हे राज्यात चांगले नेतृत्व करत आहेत. येथील संस्था चांगल्या असून महसूल खाते सांभाळत सरकारमध्ये ते चांगले काम करत आहेत. संगमनेरचा लौकिक हा

    सहकार,शिक्षण,समाजकारण्,सांस्कृतिक,सुरक्षिता या सर्व क्षेत्रातील प्रगतीमुळे निर्माण झाला आहे. आ.डॉ. तांबे म्हणाले की, महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अत्यंत अडचणीच्या काळात ऊसाला खूप चांगला भाव दिला आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शकता ही तत्वे कायम जोपासली असून या कारखान्याने आधुनिकीकरण व दूरदृष्टीने निर्णय घेत वाटचाल केली असून ती इतरांसाठी मार्गदर्शक आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर संतोष हासे यांनी आभार मानले.