संत भगवान बाबांचे विचार युवकांसाठी दिशादर्शक

बाळासाहेब सानप यांचे प्रतिपादन
अहमदनगर: महाराष्ट्र राज्यात समाजसेवेचे व्रत घेऊन संत भगवान बाबांच्या विचारांच्या प्रेरणेने जय भगवान महासंघ सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करत आहे. महाराष्ट्र राज्यात महासंघाच्या पुढा काराने १५१ भगवान बाबांचे मंदीर बांधण्यात आले असून, भगवान बाबांचे विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे. यामुळे राज्यात मोठा बदल घडत असून, युवकांना दिशा देण्याचे प्रमुख उद्दीष्ट समोर ठेऊन महासंघ कार्यरत आहे. चंगळवादी युगात युवक भरकटत असताना भगवान बाबांचे विचार दिशादर्शक असल्याची भावना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केली.
जय भगवान महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मदन पालवे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीच्या कार्यक्रमात  राष्ट्रीय अध्यक्ष सानप बोलत होते. जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांच्या हस्ते पालवे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनिल त्रिंबके, सोपानराव पालवे, माजी मुख्याध्यापक महादेव पालवे, अविनाश निकरड, अ‍ॅड. पोपट पालवे, अ‍ॅड. संदिप जावळे, जय हिंद वृक्ष बँकचे संचालक शिवाजी गर्जे, गौरव गर्जे, मा.सरपंच बाबाजीभाऊ पालवे, सुभाष निंबाळकर, दिपक गाडे, संजय आव्हाड, कैलास गर्जे, अमोल खाडे, विजय आव्हाड, किशोर पालवे, विकी पालवे, सचिन पालवे, मच्छिंद्र पालवे, बबलू पालवे, सुभेदार मेजर, अशोक गर्जे, रघुनाथ औटी, नईम शेख, शरद मोर्तुंडकर, प्रभाकर पोतकुले, उद्धव गिते, बाळासाहेब पालवे, आजिनाथ पालवे, दिपक गिते, एकनाथ पालवे, नामदेव गिते, किरण पालवे, बाजीराव गिते, बाळासाहेब जावळे, अभिषेक बोडखे, रोहीदास पालवे, राजू शिंदे, रामकिसन साबळे, राजू पालवे, सतिश घुले, आजिनाथ डमाळे, बंटी बोडखे प्रसाद पालवे आदि उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक गावात जय भगवान महासंघाची शाखा काढून समाज कार्यामध्ये युवकांना संधी दिली जाणार असल्याचे मदन पालवे यांनी सांगीतले. या निवडीबद्दल जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व कोल्हेश्‍वरी ग्रुपच्या वतीने शिवाजी पालवे यांनी या निवडीबद्दल मदन पालवे यांचा सत्कार केला. रूषीकेश पालवे यांनी आभार मानले.