कोरोना रोखण्यासाठी कडक निर्णय घ्यावे लागतील; बाळासाहेब थोरात यांचा ईशारा

    अहमदनगर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमामही वाढत आऐहे. याचं पार्श्वभूमीवर राज्या सरकारने कडक निर्बंध लावले आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात असले तरीही कोरोना रोखण्यात यश आलेले नाही. याचं पार्श्वभूमीवर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

    थोरात म्हणाले की कोरोना रोखण्यासाठी कडक निर्णय घ्यावे लागतील. संपूर्ण जगात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, याचं पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. या बैठकीत सर्व पक्षिय नेते उपस्थित असणार आहेत. अशी माहिती थोरातांनी दिली. तसेचं कोरोना रोखण्यासाठी कडक निर्णय घ्यावे लागतील असा ईशाराही थोरातांनी दिला.

    दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर शहर व तालुक्यातील प्रशासकीय, आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण व कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक घेतली.