अल्कोहोल
अल्कोहोल

राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशात आता एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    अहमदनगर : राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशात आता एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तयार केलेला दारुचा काढा कोरोना रुग्णांना बरे करत आहे. हे प्रकरण अहमदनगरच्या शेवगावमधील बोधेगाव येथील कोविड सेंटरमधील आहे. या सेंटरमध्ये तैनात असलेले डॉक्टर गणेश भिसे यांनी हा दावा केला आहे.

    शेवगावमधील अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सध्या गणेश भिसे यांची पोस्ट व्हायरल होत आहे. यात त्यांनी देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा दावा केला आहे. डॉक्टर गणेश भिसे यांनी या व्हायरल पोस्टमध्ये असेही सांगितले आहे की, दारु आणि नशेचे समर्थन करत नाही. मात्र, मी देशी दारुच्या वापराने आतापर्यंत 50 हून अधिक कोरोना रुग्णांना बरे केले आहे.

    हा काढा बनवण्यासाठी देशी दारु केवळ 30 मिलीच घ्यायला हवी. या व्हायरल पोस्टमध्ये डॉक्टरांनी केलेल्या दाव्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर डॉक्टर भिसे यांना संपर्क केला असता त्यांनीदेखील या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.