तृप्ती देसाई यांना शिर्डीत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी रोखले ; ड्रेसकोडचा फलक काढण्याबाबत तृप्ती देसाई ठाम

शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानातर्फे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोशाखात येण्याची विनंती करत त्याबाबतचा फलक मंदिरात लावला आहे. याला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच असा निर्धार त्यांनी केला असल्याचे आज सांगितले. यासाठी त्या आज शिर्डीकडे रवाना झालेल्या मात्र त्यांना शिर्डी प्रवेशापूर्वीच सूपा टोलनाक्या जवळ पोलिसांनी अडवले आहे.

तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यानंतर शिर्डीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देसाई यांना ११ प्रांताधिकाऱ्यांकडून डिसेंबरपर्यंत शिर्डीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. असं असलं तरीही आज शिर्डीमध्ये जाऊन ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणार असल्याचा दावा देसाई यांच्याकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिर्डीमध्ये जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.शिर्डी संस्थानांनी देखील त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून त्यांना शिर्डीत येऊ देणार नाही असे सांगितले आहे.

“शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारणार” असा इशारा तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

नेमकं काय होते हे प्रकरण:

अनलॉकच्या टप्प्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरु झाली. त्याचबरोबर शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा मंदिर देखील सुरु झाले. मात्र काही दिवसांपूर्वी या मंदिराबाहेर एक फलक लावण्यात आले. या फलकावर ‘मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा’ असं आवाहन संस्थानकडून करण्यात आले होते. याला विरोध करत तृप्ती देसाईंनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.