जगातील २१ देशांतील लाखो साईभक्त साईचरित्र पारायणाच्या उपक्रमात सहभागी

शिर्डी: कोरोनाने जगाला बंदीशाळा केली असल्याने संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करित आहेत. डॉक्टर्स आणि शात्रज्ञ अहोरात्र मेहनत करून या महाभयंकर आजारावर औषध शोधण्यासाठी धडपड करित असताना आता

शिर्डी: कोरोनाने जगाला बंदीशाळा केली असल्याने संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करित आहेत. डॉक्टर्स आणि शात्रज्ञ अहोरात्र मेहनत करून या महाभयंकर आजारावर औषध शोधण्यासाठी धडपड करित असताना आता विज्ञानाला अध्यात्माची जोड देत कोरोनाचा समुळ नायनाट व्हावा व कोरोनाच्या लढाईतील योध्यांना आत्मबळ मिळावे यासाठी साईनिर्माणच्यावतीने महिनाभरापासुन घर तेथे साईचरित्र या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असुन आज भारतासह संपुर्ण जगातील २१ देशांतील लाखो साईभक्त या उपक्रमात सहभागी होत असल्याचे साईनिर्माण उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी माहिती दिली.

शिर्डीतील साईनिर्माण उद्योग समुहाच्या माध्यमातून आजवर देशाच्या विविध भागात दिड हजार गावांत सामुदायिक साईसतचरित्राचे पारायन आयोजित करून साईचरित्र वाचनाची मोठी चळवळ उभी केली आहे. या माध्यमातून लाखो साईभक्तांचा साईनिर्माण परिवारासोबत जोडले गेले आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत महामारीचे संकट दूर केले असल्याचा दाखला साईसतचरित्रात आहे. याच पाश्वभुमीवर साईनिर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी पुढाकार घेवून माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि साईनिर्माणच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने लॉंकडाऊन काळात एक महिन्यापूर्वी साईबाबांच्या शिर्डीतून घर तेथे साईसतचरित्र पारायणाची सुरवात केली. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाल्याने त्याची व्याप्ती वाढत जावून दुसर्‍या गुरूवारी जिल्ह्यात व तिसर्‍या गुरूवारी संपूर्ण राज्यात चार लाखांच्यावर साईभक्तांनी घरात बसुन साईचरित्राचे वाचन केले. करोनाच्या संकटातून जगाला सावरावे आणि या संकटाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या योध्यांना आत्मबळ मिळावे यासाठी साईबाबांना साकडे या पारायणाच्या माध्यमातून घातले जात असल्याचे विजय कोते यांनी सांगितले.

 आज झालेल्या पारायणात देशातील साईभक्त त्याचप्रमाणे अमेरीका, युनायटेड किंगडम, कँनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान, थायलंड, मलेशिया, केनिया, तांजाविया, युगांडा, श्रीलंका, नेपाळ, आखाती राष्ट्रे, ओमान,कतार, जर्मनी, तैवान, बार्बाडोस, मॉरीशस, फीजी, इंडोनेशिया, सिंगापुर इ. विदेशातील साईभक्त विश्वविक्रमी घर तेथे साईचरित्र पारायणात सहभागी झाल्याचे समजते.