पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची दोन वर्षे, २१ पैकी १७ प्रकल्प पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असेलल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या निर्माणाचे कार्य अवघ्या ३३ महिन्यांत पूर्ण झाले होते. देशाचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंचीचे शिल्प उभारण्यात आले आहे. २०१० साली नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ही प्रतिमा स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली होती, २०१३ साली प्रतिमा निर्मितीचे काम सुरु करण्यात आले.

  • अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण

केवाडिया (Kevadia). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असेलल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या निर्माणाचे कार्य अवघ्या ३३ महिन्यांत पूर्ण झाले आहे. देशाचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंचीचे शिल्प उभारण्यात आले आहे. २०१० साली नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ही प्रतिमा स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली होती. २०१३ साली प्रतिमा निर्मितीचे काम सुरु करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शिल्पावरील हावभाव निश्चित करण्यासाठी सरदार पटेलांच्या दोन हजारांहून अधिक छायाचित्रांचे संशोधन करण्यात आले. यावरुनच या कामाचा आवाका किती मोठा आणि सूक्ष्म निरीक्षणासाखाली होता, याचा अंदाज बांधता येईल. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी संबंधित २१ प्रकल्प सुरु करण्यात आले होते, त्यातील १७ प्रकल्प आता पूर्ण झाले आहेत. दोन प्रकल्पांचे काम अद्याप सुरु आहे, दोन प्रकल्पांची माहिती मिळू शकलेली नाही.

सरदार पटेलांची हे भव्य शिल्प जागतिक कीर्तीचे मराठमोठे शिल्पकार राम सुतार यांनी डिझाईन केले आहे, लार्सन अँड टुब्रो या कंपनीने या अतिभव्य शिल्पाची निर्मिती केली आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची वैशिष्ठ्ये जाणून घेऊयात.

१०९ टन लोखंडाचा केला गेला वापर


सरदार पटेलांच्या या शिल्पाचे वैशिष्ट्य हे की या शिल्पात वापरण्यात आलेले लोखंड हे देशभरातील शतकऱ्यांकडून आलेले आहे. देशभरातील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित जुन्य़ा लोखँडी अवजारांतून सुमारे १३५ मेट्रिक टन लोखंड या पुतळ्यासाठी दान केले, त्यातून हा भव्य पुतळा साकारण्यात आला. शेतकऱ्यांनी दिलेल्या १३५ मेट्रिक टन लोखंड गाळून त्यातून १०९ टन लोखंड तयार करण्यात आले आले, आणि त्यातून हे शिल्प साकारण्यात आले आहे.

२०१० साली नरेंद्र मोदींनी केली होती घोषणा :

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्र असताना ७ ऑक्टोबर २०१० साली अहमदाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सरदारांचा भव्य पुतळा आणि स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ साली या स्मारकाचे काम सुरु करण्यात आले आणि ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सरदार पटेलांच्या १४३ व्या जयंतीच्या दिवशी हे शिल्प पूर्ण झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
फोटो

२.१० लाख घनमीटर सिमेंट कॉन्क्रिटचा वापर

या शिल्पाच्या निर्मितीसाठी २९८९ कोटी रुपयांचा खर्च आला. या शिल्पासाठी २.१० लाख घनमीटर सिमेंट कॉन्क्रिट आणि २००० टन तांब्याचा उपयोग करण्यात आला. यात ६ हजार ५०० टन स्टील आणि १८,५०० टन लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आला आहे. १२ किलोमीटर परिसरात हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
फोटो

शिल्पकार राम सुतार यांनी साकारले डिझाईन

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे मूळ डिझाईन मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी तयार केले आहे. ९३ वर्षीय राम सुतार हे जागतिक कीर्तीचे शिल्पकार आहेत. मुंबईत होणाऱ्या प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे डिझाईनही राम सुतार यांनीच केले आहेत. सुतार यांनी १८ फुटांच्या उंचीची शिल्पे साकारली आहेत, त्यात सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, महाराजा रणजीत सिंह, शहीद भगतसिंग, जयप्रकाश नारायण यांच्या शिल्पांचा समावेश आहे. त्यांनी घडवलेली महात्मा गांधीजींची शिल्पे ही फ्रान्स, इटली, अर्जेंटिनास रशिया, इंग्लंड, जर्मनी, मलेशिया आणि ऑस्ट्रेलियात स्थापित आहेत.

कसे असावे सरदार पटेलांचे शिल्प ? अमेरिकन इतिहासाकाराने सांगितले होते..
एका अमेरिकन इतिहासकाराला सरदार पटेल यांचा स्वभाव, पेहराव आणि त्यांचंया व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले होते, त्यावरुन या शिल्पाच्या चेहऱ्यावरील हावभाव तयार करण्यात येणार होते, अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी दिली. या इतिहासकाराने पटेलांच्या मूर्ती, फोटो यांचा अभ्यास केला. याबाबत सादर केलेल्या अहवालात त्यांनी नमूद केले की अहमदाबाद विमानतळावर असलेल्या सरदार पटेलांच्या शिल्पाप्रमाणेच त्यांचा स्वभाव आणि पेहराव होता. त्यामुळे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे डिझाईन तेच असायला हवे.

का खास आहे (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ?
• हे शिल्प ६.५ रिश्टर स्केल भूकंपांनतरही हलणार नाही, २२० किमी वेगाने वादळाचा सामना करण्याची क्षमता
• शिल्पात ८५ टक्के तांब्याचा वापर असल्याने हजारो वर्ष ते गंजणार नाही
• शिल्पाच्या गॅलरीत उभे राहून एकाच वेळी ४० जण सरदार सरोवर धरण आणि विंध्य पर्तवरांगाचे दर्शन घेऊ शकतात
• या पुतळ्यात दोन हाय स्पीड लिफ्ट लावण्यात आल्या आहेत, ज्या पर्यटकांना सरदार पटेलांच्या शिल्पातील छातीच्या ठिकाणी असलेल्या गॅलरीपर्यंत पोहचवतात. या गॅलरीत एकाच वेळी २०० जण उभे राहण्याची क्षमता.
• हे शिल्प अवघ्या ३३ महिन्यांत तयार करण्यात आले, जो एक रेकॉर्ड आहे. चीनमध्ये स्प्रींग टेम्पलमध्ये भगवान बुद्धांच्या शिल्पाच्या निर्माणाला ११ वर्षांचा कालावधी लागला होता.
• शिल्प साकारताना, शिल्प हुबेहुब सरदार पटेलांसारखेच व्हावे, यासाठी प्रचंड कष्ट घेण्यात आले. यासाठी सरदारांच्या २००० हून अधिक छायाचित्रांचा अभ्यास करण्यात आला.


स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील दर्शनीय स्थळे
•  स्वीश्व वन :  या ठिकाणी सातही खंडातील वनस्पती, रोपे आणि वृक्ष आहेत. अनेकतेतून एकता हा भाव यातून प्रगट होत राहतो.

• एकता नर्सरी : 

पर्यटकांनी इथे आल्यावर या नर्सरीतून ‘प्लँट ऑफ युनिटी’च्या नावाखाली एक तरी रोपटे घरी न्यावे, या उद्देशाने ही नर्सरी सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला इथे १ लाख रोपं लावण्यात ली होती, त्यातील ३० हजार रोपटी आता विक्रीसाठी तयार आहेत.

• बटरफ्लाय गार्डन :

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या परिसरात नैसर्गिक रंगांची उधळण पर्यटकांना अनुभवता यावी, यासाठी इथे फुलपाखरांच्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे सहा एकर परिसर असलेल्या या भव्य बगिच्यात ४५ प्रजातींची फुलपाखरे आहेत.

• एकता ऑडिटोरियम : 

सुमारे १७०० वर्ग मीटरमध्ये हे विस्तिर्ण सभागृह साकारण्यात आले आहे. या ठिकाणी संगीत, नृत्य, नाटक, कार्यशाळांचे आजोयन करण्यात येते.

• रिव्हर राफ्टिंग

रिव्हर राफ्टिंग हा साहसी क्रीडा प्रकार आहे. या ठिकाणी येणारे साहसी पर्यटक आणि खेळाडू इथे रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकतात.