जनतेसाठी विकास केंद्रस्थानी मानून काम करत राहाणार ; गद्दारी करणाऱ्यांना जनताच धडा शिकवणार : वैभव पिचड

अहमदनगर जिल्हा बँक,अगस्ती कारखाना,कृषी उत्पन्न बाजारसमिती,अमृतसागर दूध संघ,जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी संस्थेच्या संचालक पदांसह अध्यक्ष पदाच्या संधी देऊनही काही कार्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला सोडून गेलेत हे तालुक्यातील जनता कधीच विसरणार नाही.जिकडे घुग-या तिकडे उदो- उदो, अशी यांची सवय असल्याने या लाभार्थ्यांनी तिकडे जाऊन लाभ मिळविण्यासाठी पक्ष प्रवेश केला हे जनतेला माहीत आहे.

    समशेरपूर : अकोले तालुक्यातील विविध संस्थांवर ज्यांना वर्षानुवर्षे काम करण्याची संधी दिली तेच सोडून गेले,स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःची झोळी भरण्यासाठीच राजकारण केले,जनतेचा विश्वासघात केला अशा गद्दारांना जनताच धडा शिकवणार आहे कार्यकर्त्यांनी नवीन उमेदीने कामाला लागावे,सोडून गेलेल्यांचा विचार न करता जनतेचा विकास केंद्रबिंदू मानून काम करत राहाणार असे मत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले.

    अकोले तालुक्यातील देवठाण येथे अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकाम भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी अर्थ व बांधकाम समिती चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे,देवठाण गटाचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे,मा जी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे,पंचायत समिती सभापती उर्मिला राऊत,उपसभापती दत्तात्रय देशमुख,भाजपा चे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे,पं स.सदस्या माधवी जगधने,अमृतसागर दूध संघाचे व्हा .चेअरमन रावसाहेब वाकचौरे,अगस्ती कारखान्याचे संचालक सुनील दातीर,माजी पं.स.सदस्य अरुण शेळके,कैलासराव जाधव,देवठाण चे सरपंच केशव बोडके,उपसरपंच वामन गिहे ,गिरजाजी जाधव,डोंगरगाव चे सरपंच रामदास उगले,शंभू नेहे आदींसह अधिकारी उपस्थिती होते.

    पुढे बोलताना पिचड म्हणाले की,अहमदनगर जिल्हा बँक,अगस्ती कारखाना,कृषी उत्पन्न बाजारसमिती,अमृतसागर दूध संघ,जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी संस्थेच्या संचालक पदांसह अध्यक्ष पदाच्या संधी देऊनही काही कार्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला सोडून गेलेत हे तालुक्यातील जनता कधीच विसरणार नाही.जिकडे घुग-या तिकडे उदो- उदो, अशी यांची सवय असल्याने या लाभार्थ्यांनी तिकडे जाऊन लाभ मिळविण्यासाठी पक्ष प्रवेश केला हे जनतेला माहीत आहे.जिल्हा बँकेत आपले स्वतःचे नातेवाईक कामाला लावले एकही सर्वसामान्य माणसाचे काम त्यांनी केले नाही,अगस्ती कारखान्यात सुद्धा तोच प्रकार आपले जवळचे नोकरीस लावणे त्यांना कायम करणे,हे प्रकार त्यांनी केले.स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी जनतेला धोका दिला.माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी ज्यांना राजकारणात लहानाचे मोठे केले त्यांना सोडणारे हे सर्वसामान्य जनतेला वार्यावरच सोडणार हे जनता ओळखून आहे असेही पिचड यावेळी म्हणाले.तरुण कार्यकर्त्यांनी नवीन उमेदीने कामाला लागावे,जे गेले त्यांना जाऊ द्या त्यांच्याकडे लक्ष नदेता तालुक्यातील जनतेसाठी आपण सदैव काम करत राहू असे त्यांनी यावेळी सांगितले

    तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहेमीच प्रयत्नशील आहे.सध्या अकोले तालुक्यात सुरू असलेले विकास कामे हि माझ्या काळातील मंजूर कामे असून विद्यमान आमदारांनी कामे मंजूर करावी मग त्यावर बोलावे असा टोलाही पिचड यांनी यावेळी लगावला.