When you are healed, plant a tree, you will get a lot of oxygen; The doctor wrote the instructions directly on the prescription

सध्या कोविडच्या काळात ऑक्सिजनची काय आवश्यकता आहे, हे लोकांना कळायला लागले आहे. उगाच त्याला प्राणवायू म्हणत नाहीत, हेही पटले आहे. खासगी असो नाही तर सरकारी हे सर्वच वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर जिवाची बाजी लावून सुविधा देत आहेत. आपल्या परीने ते लोकांचे प्रबोधनही करीत आहेत. नगर तालुक्यातील वाळकी गावातील डॉक्टर दाम्पत्याने प्रिस्क्रिप्शनद्वारे दिलेला संदेश सोशल मीडियातून तुफान व्हायरल होतो आहे.

  अहमदनगर : सध्या कोविडच्या काळात ऑक्सिजनची काय आवश्यकता आहे, हे लोकांना कळायला लागले आहे. उगाच त्याला प्राणवायू म्हणत नाहीत, हेही पटले आहे. खासगी असो नाही तर सरकारी हे सर्वच वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर जिवाची बाजी लावून सुविधा देत आहेत. आपल्या परीने ते लोकांचे प्रबोधनही करीत आहेत. नगर तालुक्यातील वाळकी गावातील डॉक्टर दाम्पत्याने प्रिस्क्रिप्शनद्वारे दिलेला संदेश सोशल मीडियातून तुफान व्हायरल होतो आहे.

  आगळावेगळा प्रयोग

  डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर सर्वसाधारणपणे अमूक गोळी सकाळी, दुपारी घ्या. तमूक औषध जेवणानंतर घ्या, अशा आशयाचा मजकूर असतो. परंतु नगरच्या डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शनने सर्वांचे खाडकन डोळे उघडले आहेत. असे अनोखे प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या डॉ. युवराज आणि कोमल कासार यांचे वाळकी गावात संजीवनी नावाचे हॉस्पिटल आहे. गेल्या वर्षीपासून तेथे त्यांनी कोविड सेंटरही सुरू केले. आतापर्यंत त्यांच्या कोविड सेंटरमधून पाचशेहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. परिसरातील लोकांसाठी हे दाम्पत्य देवासमान ठरत आहे. कारण दूर शहरात बेड मिळत नाही. खर्चही परवडत नाही. त्यामुळे संजीवनी हॉस्पिटल खरोखरच परिसराला संजीवनी देत आहे.

  असा देताता सल्ला

  डॉ. युवराज कासार सांगतात, लोकांचे आम्हाला खूप फोन येतात. ऑक्सिजन बेड मिळवून द्या, इंजेक्शनची काय व्यवस्था होईल का… प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांचे अशाच आशयाचे फोन असतात. आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. परंतु काही गोष्टी आमच्याही हातात नाहीत. पेशंट किंवा नातेवाईकांनी नियम पाळले तर ही वेळच येणार नाही. आमच्या कोविड सेंटरमधून डिस्चार्ज घेऊन जातात प्रत्येक पेशंट विचारतो, आता काय काळजी घेतली पाहिजे. त्यांना आम्ही सांगतो, योग्य आहार घ्या. प्राणायाम, योगासने करा. मनशांती ठेवा. त्याबरोबर एक झाडही लावा म्हणजे हवा तेवढा ऑक्सिजन मिळेल, असे लिहिण्याची कल्पना सुचली. त्याचा खूप मोठा प्रभाव पडला आहे. लोकांचे खूप फोन येत आहेत. प्रत्येकाने झाड लावले तर पर्यावरण चक्रही राखले जाईल, असे डॉ. कोमल कासार यांनी सांगितले.

  असे आहे प्रिस्क्रिप्शन

  आजारातून बरा झाल्यानंतर एक झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही, असा तो संदेश आहे. महाराष्ट्रातील सर्वच माध्यमातून हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल होते आहे. प्रत्येक रुग्णासाठी प्रिस्क्रिप्शनवर हाताने संदेश लिहिण्यासाठी मोठा वेळ जात होता, त्यामुळे आता आम्ही स्टॅम्प बनवून घेतला आहे.